अयोध्येला जाण्यापूर्वी रामचरणच्या भेटीसाठी चाहत्यांची तुफान गर्दी; फोटो, मूर्ती दिले भेट
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रामचरण आणि मेगास्टार चिरंजीवी हे अयोध्येत पोहोचले आहेत. त्यापूर्वी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. विविध चाहत्यांनी त्यांना भेटवस्तूही दिल्या आहेत. प्रभू श्रीराम यांचा फोटो फ्रेम, मूर्ती अशा अनेक भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या आहेत.
1 / 8
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज, सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी केवळ अयोध्याच नव्हे, तर सगळा देश सजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल.
2 / 8
यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनाही अयोध्येत बोलावलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, रामचरण, उद्याोजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने रामजन्मभूमीवरील नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल.
3 / 8
अयोध्येला रवाना होण्यापूर्वी मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामचरण यांनी चाहत्यांची भेट घेतली. या दोघांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी घराबाहेर तुफान गर्दी केली होती. यावेळी काहींनी रामचरण आणि चिरंजीवी यांना भेटवस्तूही दिल्या आहेत.
4 / 8
काही चाहत्यांनी प्रभू श्रीराम यांच्या फोटोचा फ्रेम तर काहींनी मूर्ती भेट म्हणून दिली. रामचरण आणि चिरंजीवी यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या प्रेमाची झलक या फोटोंमध्ये सहज पहायला मिळतेय.
5 / 8
आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी मुख्य सोहळा सुरू होईल आणि सुमारे 40 मिनिटे प्राणप्रतिष्ठा सोहळा चालेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचं भाषण होईल. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश असेल. तरी जगभरातील कोट्यवधी लोक दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमातून सोहळा अनुभवतील.
6 / 8
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू आहे. अयोध्येमध्ये फुलांची सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. देशभरातील विविध मंदिरांमध्येही आरत्या, घंटानाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
7 / 8
या सोहळ्यासाठी देशभरातून कुंकू, अत्तर, विशाल घंटा, महाकाय कुलूप, 108 फूट लांबीची अगरबत्ती, 1110 किलोंचा दिवा, 1265 किलोंचा लाडू अशा विविध भेटवस्तू पाठविण्यात आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर या सीतेच्या माहेरहूनही तीन हजार भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत.
8 / 8
अयोध्येत जाण्यापूर्वी रामचरणने घेतली चाहत्यांची भेट