मी रडते, मला वाईट वाटतं पण.. जेव्हा कतरिना रणबीरसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे झाली व्यक्त

| Updated on: Apr 24, 2024 | 4:42 PM

अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचं रिलेशनशिप बॉलिवूडमध्ये एकेकाळी खूप चर्चेत होतं. एका मुलाखतीत कतरिना तिच्या ब्रेकअपविषयी व्यक्त झाली होती. यावेळी तिने आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीविषयीही सांगितलं.

1 / 5
अभिनेता रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. यामध्ये दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. आता आलिया, दीपिका आणि कतरिना या तिघींमध्ये चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत कतरिनाला आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

2 / 5
दीपिका आणि रणबीर यांचा 2009 मध्ये ब्रेकअप झाला होता. त्यानंतर रणबीरने कतरिनाला डेट करायला सुरुवात केली. 2009 ते 2016 पर्यंत रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. रणबीरच्या कुटुंबीयांना त्याचं कतरिनासोबतचं नातं फारसं पसंत नव्हतं. या मतभेदांनंतर दोघांनी ब्रेकअप केला.

3 / 5
कतरिनाला 2019 मध्ये एका मुलाखतीत विचारलं गेलं की तिची आलियाशी कशी मैत्री झाली, जी त्यावेळी रणबीरला डेट करत होती? आणि दीपिकासोबत तिचं नातं कसं आहे?

4 / 5
या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, "ही तर भावनेची गोष्ट झाली. बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही. आपल्या मनात राग किंवा नाराजी ठेवल्याने काहीच ठीक होत नाही. इथे तुमचे विचार मर्यादित होतात. पण मीसुद्धा माणूसच आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, मीसुद्धा रडते. मात्र तरी मी पुन्हा उभी राहते आणि म्हणते की सगळं ठीक आहे."

5 / 5
दीपिकासोबतच्या मैत्रीविषयी कतरिना पुढे म्हणाली, "आमच्यात आता चांगलं नातं आहे. माझं आता तिच्याशी काहीच शत्रुत्व नाही. मला ती नेहमीच आवडायची आणि कामाप्रती तिची मेहनत पाहून मी नेहमीच तिचा आदर करते."