गुडघ्याला दुखापत झाल्याने सोडावं लागलं बॅडमिंटन, IAS होत अनेकांसाठी बनली प्रेरणा
Kuhoo Garg Success Story: एखादी चुकीची गोष्ट घडली तर अनेक जण त्यामुळे निराश होऊन जातात. पण चुकीचं काही घडल्यानंतर ही जे लोकं खचून न जाता पुढे जातात तेच लोकं इतिहास घडवतात. असेच एक उदाहरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिने खचून न जाता यूपीएससीची तयारी सुरु केली आणि यश मिळवलं.
1 / 5
अनेक लोकांचा कल सरकारी नोकऱ्यांकडे असतो. पण काही लोक असे असतात ज्यांना नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याची इच्छा असते. जे अनेकांसाठी प्रेरणा बनतात. असेच एक नाव आहे म्हणजे कुहू गर्ग. जी एक चांगली ऍथलीट आहे, जिने 2023 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) ऑल इंडिया रँक (AIR) 178 सह उत्तीर्ण केली आहे.
2 / 5
उत्तराखंडचे निवृत्त डीजीपी अशोक कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी कुहू गर्गने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. कुहू गर्ग ही बॅडमिंटनपटू असून ती मूळची उत्तराखंडची आहे. तिचे वडील अशोक कुमार हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कुहू गर्गची आई अलकनंदा अशोक पंतनगर विद्यापीठात काम करतात.
3 / 5
कुहू गर्ग हिने पदवी प्राप्त केली असून कुहू वयाच्या ९व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळातेय. आतापर्यंत तिने बॅडमिंटनमध्ये 56 राष्ट्रीय (ऑल इंडिया रँकिंग) आणि 19 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही तिने आपले नाव नोंदवले आहे.
4 / 5
2018 मध्ये गर्गने वर्ल्ड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरीही ती खेळली होती. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणे ही तिच्या गौरवशाली कारकिर्दीतील आणखी एक यश आहे.
5 / 5
कुहू गर्गचा यूपीएससी प्रवास सुरू झाला जेव्हा तिला बॅडमिंटन खेळताना गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तिला बराच वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, त्यामुळे तिने नागरी सेवा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. तिने वेळेचा पुरेपूर उपयोग करून परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. मेहनत आणि समर्पण रंगले आणि तिने UPSC 2023 मध्ये AIR 178 मिळवले.