अप्सराच्या सुंदर वेशभूषेत भारताच्या राजदूत, अमेरिकेत का झाली होती त्यांना अटक
भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आता देवयानी खोब्रागडे यांचे एक फोटोशूट चर्चेत आले आहे. कंबोडियाची राजदूत असलेल्या देवयानी यांनी स्वत: सोशल मीडियावर हे फोटो टाकले आहे. त्यात अप्सरेच्या वेशभूषेत त्या आहेत.
1 / 5
कंबोडियाच्या पारंपारिक पोशाखाला खमेर अप्सरा म्हणतात. कंबोडियाच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी हे फोटोशूट केले आहे. देवयानी खोब्रागडे 1999 आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकारी आहेत. त्या 2020 पासून कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत आहेत.
2 / 5
देवयानी खोब्रागडे यांनी भारतीय दूतावासात रोम, न्यूयॉर्क, इस्लामाबाद आणि बर्लिनमध्ये काम केले आहे. परंतु अमेरिकेतील त्यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता.
3 / 5
2013 मध्ये देवयानी खोब्रागडे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील भारतीय दुतावासात कार्यरत होत्या. त्यांच्यावर मोलकरणीचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. तसेच व्हिसा फसवणूक प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले होते. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. परंतु कॉन्सुल इम्युनिटी असल्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती.
4 / 5
देवयानी खोब्रागडे यांचे वडील आयएएस अधिकारी आहेत. बेस्टचे माजी महासंचालक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते उत्तम खोब्रागडे त्यांचे वडील आहेत. आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले होते. देवयानी खोब्रागडे यांचे पती आकाश सिंह राठौर अमेरिकन नागरिक आहेत. ते रोम विद्यापीठात प्रोफेसर आहेत.
5 / 5
आता कंबोडियामधील खमेर या नववर्षानिमित्त देवयानी खोब्रागडे यांचे फोटोशूट चर्चेत आले आहे. तीन दिवस हा पांरपारिक उत्सव सुरु आहे. 13, 14 आणि 15 एप्रिल रोजी हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात त्या अप्सरेच्या वेशभूषेत दिसून आल्या.