देशासह राज्यात काही दिवसांपूर्वी थंडीची लाट पाहायला मिळत होती.मात्र आता वातावरणात अचानक बदल झाला आहे. दिवसभर कडक ऊन पडत आहे. वेगानं हवा वाहत असून, चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे.
चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं (IMD) ने म्हटलं आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
नुसता पाऊसच पडणार नाही तर आणखी एक मोठं संकट आहे, ते म्हणजे वादळीवारा आणि कडाक्यांच्या वीजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस.13 फेब्रुवारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पूर्वोत्तर बांग्लादेश आणि आसामध्ये साइक्लोनिक सर्कुलेशन तयार झालं आहे. त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम सोबतच जम्मू काश्मीर आणि लेह, लडाखमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे.
दरम्यान देशातील इतर भागात जोरदार वारे वाहणार असून, थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. असं आयएमडीनं म्हटलं आहे.