वनविभागाच्या बचाव पथकाने गायीला बेशुद्ध केले. अखेर या नीलगायीला ताब्यात घेण्यात आले. जखमी नीलगायीवर उपचार करून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
एका घरात आश्रयाला आलेली निलगाय. अनेक घरांचा आश्रय घेतला. गावकरीही तिला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे ही नीलगाय आणखीनच सैरावैरा पळू लागली.
कळपापासून दूर गेल्याने ही नीलगाय सैरभर झाली. ती गावात सैरावैरा पळू लागली. आश्रयासाठी घरात प्रवेश करताना निलगाय.
विडूळ गावात भरकटलेल्या नीलगायीला ( रोही ) पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. वनविभागाचे बचाव पथक येथे आले होते.
यवतमाळ जिल्ह्यात जंगलातील रोहीच्या कळपाचा काही श्वानांनी पाठलाग केला. त्यानंतर ही निलगाय सैरभैर होऊन घरात शिरली.