‘हार्मोनल इम्बॅलन्स’ सुधारायचा आहे? मग हे पदार्थ ठरतील जादूची कांडी
तणाव, बाहेरील वातावरण, दीर्घकालीन आजार, अनुवांशिक बदल, विशिष्ट प्रकारची औषधे, जीवनशैलीतील बदल, अॅलर्जी, मद्यपान, धूम्रपान इत्यादींमुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार होतो ज्याला आपण 'हार्मोनल इम्बॅलन्स' असं म्हणतो. 'हार्मोनल इम्बॅलन्स' सुधारायचा असल्यास 'या' पदार्थांचा समावेश करा नक्कीच फायदा होईल.
1 / 10
हार्मोन्स म्हणजे एक प्रकारचं रसायन म्हणता येईल. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात. या ग्रंथींची एक सिस्टीम असते ज्याला 'एंडोक्राइन सिस्टम' म्हणतात.
2 / 10
तणाव, बाहेरील वातावरण, दीर्घकालीन आजार, अनुवांशिक बदल, विशिष्ट प्रकारची औषधे, जीवनशैलीतील बदल, अॅलर्जी, मद्यपान, धूम्रपान इत्यादींमुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार होतो ज्याला आपण 'हार्मोनल इम्बॅलन्स' असं म्हणतो.
3 / 10
'हार्मोनल इम्बॅलन्स' सुधारायचा असेल तर काही पथ्य पाळली आणि आहारात बदल केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवू लागेल
4 / 10
'हार्मोनल इम्बॅलन्स' सुधारण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून घेणे महत्त्वाचे असते जसं की हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जितका वापर कराल तेवढा तुम्हाला फरक जाणवेल
5 / 10
अंड देखील हार्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयुक्त असतं.
6 / 10
त्यानंतर कडधान्य आपल्या शरिरासाठी किती उपयुक्त असतात हे वेगळं सांगायला नको. मोड आलेले कडधान्य हार्मोनल संतुलन मदत करतात.
7 / 10
मेथीचे दाणे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी, केस गळतीसाठी जसा रामबाण उपाय आहे तसाच तो उपाय 'हार्मोनल इम्बॅलन्स'वरही लागू होतो.
8 / 10
तुम्हाला मशरुम आवडत असतील किंवा मशरूमची अॅलर्जी नसेल तर तुम्ही आहारात मशरुमचा नक्कीच समावेश करू शकता
9 / 10
चिया सीड्स, सूर्यफूलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, यांचे सेवनही 'हार्मोनल इम्बॅलन्स'पासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतात
10 / 10
त्यानंतर दही आणि डाळी सुद्धा तुम्ही आवर्जून आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.