केस गळती थांबवतील हे 5 सुपरफूड्स, मिळतील लांब केस!
केस हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. केसांमध्ये सौंदर्य असतं, निरोगी आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. केसांची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करता येतात फक्त सातत्य हवं. कोणते पदार्थ आहेत असे? कोणते पदार्थ आहारात असावेत? बघुयात...
1 / 5
दही केसांसाठी खूप चांगलं असतं. तुमच्या आजूबाजूला देखील अनेकजण दही केसांना लावत असतील. दही हे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. केसांची गळती थांबवायची असेल आणि टक्कल पडण्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर दही केसांना लावा.
2 / 5
अक्रोड केसांसाठी फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि प्रथिने असतात. हे सर्व घटक केस मजबूत आणि चमकदार बनविण्यास मदत करतात, ज्यामुळे केसगळती थांबते.
3 / 5
फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम एका कुठल्या फळात असेल तर ते आहे एवोकॅडो. एवोकॅडो हे महाग फळ असल्यानं त्याचा समावेश सामान्यांच्या आहारात नाही. पण हे फळ खाल्ल्यानं केस मजबूत होतात आणि केस गळत नाहीत.
4 / 5
फळांसोबतच हिरव्या पालेभाज्या खाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पालक आणि मेथीमध्ये केसांच्या आरोग्यासाठीचे सगळे घटक असतात, यामुळे केस मजबूत होतात.
5 / 5
अंडी केसांसाठी खूप पोषक असतात. प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 अंड्यामध्ये असते. अंडी खाल्ल्याने आणि केसांना लावल्याने केस गळती थांबते. केस मजबूत राहतात.