ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोपात अडकलेला भारतीय क्रिकेटपटू, आता आला मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये हा क्रिकेटपटू खेळायचा. बीबीएलमध्ये उनमुक्त चंदनंतर खेळणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.
-
-
निखिल चौधरी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला होता. सुट्टी घालवण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला गेलेला. पण कोविड प्रतिबंधामुळे त्याला तिथेच थांबावं लागलं. त्यानंतर त्याने तिथेच आपलं क्रिकेट करीअर पुढे सुरु करण्याचा निर्णय घेतला. (Photo: Steve Bell/Getty Images)
-
-
बीबीएलमध्ये उनमुक्त चंदनंतर खेळणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. 2023 साली होबार्ट हरिकेन्सकडून तो बीबीएलमध्ये पहिली मॅच खेळला होता. लीगमध्ये आतापर्यंत तो 9 सामने खेळलाय. यात 154 रन्स करण्यासह त्याने 5 विकेट घेतलेत. (Photo: Daniel Pockett – CA/Cricket Australia via Getty Images)
-
-
निखिल 28 वर्षांचा आहे. बीबीएलमध्ये खेळण्यााधी तो भारतात पंजाबसाठी अंडर-16, अंडर-19 आणि अंडर-22 क्रिकेट खेळलाय. त्याशिवाय विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा तो खेळला आहे. (Photo:Steve Bell/Getty Images)
-
-
भारतीय वंशाचा क्रिकेटपटू निखिल चौधरीला दिलासा देणारी बातमी आहे. तीन वर्षापूर्वीच्या बलात्कार प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टाऊसविलमध्ये एका तरुणीने निखिलवर बलात्काराचा आरोप केला होता. (Photo: Jonathan DiMaggio/Getty Images)
-
-
या निर्णयामुळे निखिल चौधरी पुन्हा ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये पुनरागमन करणार आहे. बीबीएलमध्ये तो होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो. त्याने ही गोष्ट लपवून ठेवल्याबद्दल फ्रेंचायजीने नाराजी व्यक्त केली. . (Photo: Jonathan DiMaggio/Getty Images)