India First Hydrogen Train: ना डिझेल, ना वीज, भारतीय रेल्वे धावणार पाण्यावर, पुढील महिन्यात चाचणी
India First Hydrogen Train: वाफेचे इंजिनपासून सुरु झालेल्या रेल्वे गाडीचा प्रवास कोळसा, डिझेल अन् इलेक्ट्रीक इंजिनावर आला. भारतीय रेल्वेचा प्रवास या सर्व इंजिनावर राहिला आहे. भारतात पुढील एक, दोन वर्षांत बुलेट ट्रेनही धावणार आहे. परंतु त्यापूर्वी पाण्यावर ट्रेन धावणार आहे. पाण्याच्या मदतीने ट्रेन धावणार आहे.
1 / 6
पाण्याच्या मदतीने म्हणजे हायड्रोजनवर डिसेंबर 2024 मध्ये ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचा मार्ग, वेग निश्चित झाला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात त्याची ट्रायल रन होणार आहे. या ट्रेनला प्रत्येक तासाला 40,000 लीटर पाणी लागणार आहे. त्यासाठी वॉटर स्टोरेज बनवले जात आहे.
2 / 6
पाण्यावर धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेनवर हायड्रोजन फ्यूल सेल आणि इंफ्रास्ट्रक्चरची चाचणी यशस्वी झाली. त्याचा आराखडा आणि हायड्रोजन प्लँट मंजूर झाले आहे. देशभरात 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची तयारी सुरु आहे. एका हायड्रोजन ट्रेनसाठी जवळपास 80 कोटी खर्च येतो.
3 / 6
भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत 'नेट झिरो कार्बन एमिटर' करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी रेल्वेने हायड्रोजन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे वेगवेगळ्या मार्गावर 35 हायड्रोजन ट्रेन चालवणार आहे. ही ट्रेन हायड्रोजन फ्यूलवर धावणार आहे.
4 / 6
हायड्रोजनवर धावणाऱ्या या ट्रेनमध्ये डिजल इंजिनाऐवजी हायड्रोजन फ्यूल सेल्स असतात. कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन यांचे उत्सर्जन हायड्रोजनमुळे होत नाही.
5 / 6
हायड्रोजन फ्यूल सेल्समुळे हायड्रोजन आणि ऑक्सीजन बदलून वीज निर्माण करता येते. या विजेचा वापर ट्रेन चालवण्यासाठी करता येतो. हायड्रोजन गॅसवर धावणारे इंजिन धुराऐवजी पाण्याची बाष्प बाहेर सोडतो. तसेच डिझेल इंजिनच्या तुलनेत 60 टक्के आवाज कमी येतो. त्याचा वेग आणि प्रवाशी संख्याही डिझेल इंजिनासारखीच असते.
6 / 6
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन 90 किलोमीटर धावणार आहे. हरियाणामधील जींद-सोनीपत मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. तसेच दार्जिंलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटेन रेल्वे, कालका शिमला रेल्वे, माथेरान रेल्वे, कांगडा घाटी, बिलमोरा वाघई आणि मारवाड-देवगढ मदारिया मार्गावर ही ट्रेन चालवली जाऊ शकते. ही ट्रेन जास्तीत जास्त 140 किमी वेगाने धावू शकते. एका ट्रिपमध्ये ही ट्रेन 1000 किमीपर्यंत आंतर कापू शकते.