Marathi News Photo gallery India maldives diplomatic fight hindu king had established the country know how maldives became muslim nation
Boycott Maldives | हिंदू राजाने वसवलेल्या मालदीवच मुस्लिम राष्ट्रात कसं परिवर्तन झालं? जाणून घ्या
Boycott Maldives | आज मालदीवकडे मुस्लिम राष्ट्र म्हणून पाहिल जातं. पण मालदीवचे सुरुवातीचे राज्यकर्ते हिंदू होते. मालदीवच्या इतिहासावर नजर टाकली तर ही गोष्ट दिसून येईल. मालदीवची मुस्लिम देशाकडे कशी वाटचाल झाली? त्या बद्दल जाणून घ्या.
1 / 10
भारत आणि मालदीवमध्ये वाद सुरु आहे. भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पीएम मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. त्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर भारतात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड सुरु झाला.
2 / 10
तुंम्हाला माहितीय का? हिंद महासागरातील छोटासा देश असलेल्या मालदीववर हिंदू राजाच शासन होतं. मालदीवच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की, हा कधीकाळी हिंदू आणि बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांचा देश होता. मालदीवचा इतिहास 2500 वर्षापेक्षा पण जुना आहे.
3 / 10
मालदीवमधले सुरुवातीचे निवासी गुजराती होते. 500 ईसा पूर्व भारतातील कालीबंगा येथून लोक श्रीलंका आणि तिथून मालदीवला आले. मालदीवचे पहिले निवासी धेविस नावाने ओळखले जायचे.
4 / 10
इतिहासानुसार मालदीववर हिंदू राजाच शासन होतं. तामिळ चोल राजांनी सुद्धा काही काळ मालदीववर शासन केलं. मालदीवमध्ये नाव निर्मितीची पद्धत आणि चांदीचे शिक्के यावरुन हे लक्षात येतं.
5 / 10
12 व्या शतकात मालदीवमध्ये बदल सुरु झाला. अरब व्यापाऱ्यांच इथे आगमन झालं. त्यानंतर मालदीवच परिवर्तन हळूहळू मुस्लिम राष्ट्रामध्ये झालं.
6 / 10
अरब व्यापाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन इथला राजा आणि जनतेने इस्लाम धर्म स्वीकारायला सुरुवात केली.
7 / 10
उपलब्ध माहितीनुसार, 20 व्या शतकापर्यंत मालदीववर 6 इस्लामिक राज्यकर्त्यांच्या पिढींनी राज्य केलं.
8 / 10
इंग्रजांनी सुद्धा मालदीववर राज्य केलं. मालदीवला 1965 साली स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी भारताच मालदीवला मान्यता देणारा पहिला देश होता.
9 / 10
तो पर्यंत मालदीव मुस्लिम देश बनला होता. इथे बहुसंख्य नागरिक मुस्लिम होते. मालदीवमधला अधिकृत धर्म इस्लाम आहे. इथली 98 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.
10 / 10
मालदीवमध्ये बिगर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार नाही, याचा मालदीवच्या संविधानात उल्लेख आहे. इथे सरकारी नियम सुद्धा इस्लामिक कायद्यावर आधारित आहेत.