Ind vs SA: द्रविड सरांनी घेतला टीम इंडियाचा क्लास, नेटमध्ये कसून सराव करताना खास Photos
कसोटीआधी भारतीय संघाला तयारीसाठी 10 दिवसांचा वेळ मिळाला आहे. यावर्षात झालेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.
प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी नेटमध्ये खेळाडूंना दर्जेदार सराव आणि चांगला उत्साह दाखवण्याचा सल्ला दिला.
Follow us on
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी आज प्रतिकुल वातावरणात फलंदाजीचा सराव केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa series) आगामी मालिकेसाठी भारतीय संघ नेटमध्ये सध्या जोरदार सराव करत आहे.
. सरावाचा आज दुसरा दिवस होता. दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये पहिला मालिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.
प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी नेटमध्ये खेळाडूंना दर्जेदार सराव आणि चांगला उत्साह दाखवण्याचा सल्ला दिला.
“पहिल्या कसोटीसाठी स्वत:ला सज्ज करण्यासाठी तयारीच्या दृष्टीने पुढचे तीन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत” असे राहुल द्रविडने सांगितले.
फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांचीही कसोटी होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आव्हानात्मक होतं.
“आम्ही सरावासाठी गेलो, त्यावेळी आम्हाला वाटलं स्वच्छ सूर्यप्रकाश असेल. पण ढगाळ वातावरण होतं. गोलंदाजांसाठी असं वातावरण आव्हानात्मक असतं” असं गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितलं.
योग्य टप्यावर चेंडू टाकणं सोपं नसतं. तुम्हाला अशा वातावरणासाठी तयार असलं पाहिजे. कसोटी सामन्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या वातावरणात खेळावं लागेल.
16 डिसेंबरला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला, तेव्हापासून टीम इंडिया इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे.
कसोटीआधी भारतीय संघाला तयारीसाठी 10 दिवसांचा वेळ मिळाला आहे.