आशिया कप स्पर्धेत काल पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. या पराभवापेक्षा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहची चर्चा जास्त आहे.
अर्शदीपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. कारण अर्शदीपने सामन्यात मोक्याच्याक्षणी एक महत्त्वाचा झेल सोडला. यासाठी ट्रोलर्सनी त्याला खलिस्तानी ठरवलय.
या प्रकारानंतर पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर मोहम्मद हफीजसह काही खेळाडू या युवा गोलंदाजाच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.
या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. अर्शदीपला बदनाम करण्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला. पाकिस्तानातून त्याच्या Wikipedia पेजवर जाऊन घृणास्पद काम करण्यात आलं.
Arshdeep-singh
पाकिस्तानने एक चेंडू बाकी राखून हे लक्ष्य पार केलं.
या हाय प्रेशर गेम मध्ये 18 व्या ओव्हर मध्ये तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपच्या हातून एक झेल सुटला. त्यासाठी अर्शदीपला गुन्हेगार ठरवल जातय.
शेवटच्या षटकात अर्शदीपने त्याच आसिफचा विकेट काढून सामना अधिक रोमांचक बनवला.
काही ट्रोलर्सनी त्याला खिलस्तानी ठरवलं. त्याच्या Wikipedia पेज मध्ये एडिट करुन ते वायरल करण्यात आलं. या प्रकरणात आता पाकिस्तानच नाव समोर येतय.
अर्शदीपच्या Wikipedia पेज मध्ये खलिस्तान शब्द जोडण्यात आला. पेज एडिट करणाऱ्याच लोकेशन पाकिस्तान असल्याच म्हटलं जातय.