टीम इंडियाचे हेड कोच आणि भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी 11 जानेवारीला त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी टीम दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळत होती. केपटाऊनमध्ये (Capetown test) पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीमने आपल्या हेड कोचचा वाढदिवस साजरा केला.
राहुल द्रविड (Rahul Darvid) या नावाला जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. नवनव्या खेळाडूंमधील गुण ओळखून त्यांच्यातून चांगले क्रिकेटपटू घडवण्याची क्षमता द्रविडमध्ये आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहुल द्रविड यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.
ते भारत अ संघाचे प्रशिक्षक होते, एनसीएचे प्रमुखदेखील होते आणि सध्या ते टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहेत, जे सध्या केपटाऊनमध्ये भारतीय संघासोबत आहे. या सगळ्या भूमिकांपूर्वी राहुल द्रविड सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, हे विसरुन चालणार नाही.
मोहम्मद शमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सपोर्ट स्टाफ आणि अन्य खेळाडू दिसत आहेत.
राहुल द्रविड जवळपास दीड दशक भारताकडून क्रिकेट खेळला आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याचे एक टोपण नाव होते जॅमी. पण, भारतीय क्रिकेटची 'भिंत' बनून त्याने त्या नावाला अलविदा केला. त्याने केलेल्या काही अप्रतिम विक्रमांमुळे त्याला 'द वॉल'चे बिरुद मिळाले. त्या रेकॉर्ड्सबद्दल सांगण्यापूर्वी जाणून घ्या की, आज राहुल द्रविडचा 48 वा वाढदिवस आहे. द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.
राहुल द्रविडसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा खास आहे. कारण संघाचा हेड कोच बनल्यानंतर त्यांचा हा पहिला परदेश दौरा आहे.
मध्य प्रदेशात जन्मलेल्या आणि कर्नाटकात क्रिकेट खेळून मोठा झालेल्या द्रविडचे असे 5 रेकॉर्ड आहेत, जे त्याला खर्या अर्थाने जगासमोर भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून प्रस्थापित करतात. यातील पहिला रेकॉर्ड म्हणजे त्याने कसोटी क्रिकेटच्या क्रीजवर घालवलेला वेळ. राहुल द्रविडने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 44,152 मिनिटे म्हणजेच 735 तास 52 मिनिटे क्रीजवर घालवली आहेत, हा एक विश्वविक्रम आहे. यादरम्यान त्याने 164 सामन्यांमध्ये 52.3 च्या सरासरीने 36 शतकांसह 13,288 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 30000 पेक्षा जास्त चेंडू खेळणारा राहुल द्रविड हा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 31,258 चेंडूंचा सामना केला, जो एक विक्रम आहे.
कसोटी क्रिकेटच्या पहिल्या 286 डावात एकदाही गोल्डन डक न मिळवण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे.