इंडियन मोटरसायकलने आतापर्यंत आपल्या महत्वकांक्षी प्रोजेक्टमध्ये परस्यूट मोटरसायकलला सादर केले आहे. ही सादर केलेली बाईक आतापर्यंतच्या त्यांचा सगळ्यात सुंदर आणि जबरदस्त अशी ही बाईक आहे, आणि तीही परस्यूट भारतीय चँलेंजरवर आधारित होती.
या मोटरसायकलवर एक अॅडजेस्टबल विंडस्क्रीन, आणि आरामदायी अशी सीट आहे. आणि त्याबरोबरच एका मोठा टॉप बॉक्सही आहे. आणि त्याला जोडून इंटिग्रेटेड पिलर बॅकरेस्ट आहे. मोटरसायकलवर ही सुविधा अॅडजेस्टबल इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन सिस्टमची सुविधाही आहे.
या परस्यूटची पॉवर 1769cc लिक्विड-कूल्ड फोर-वाल्व वी-ट्विनसोबत मिळतीजुळती आहे. 121bhp ची पीक पॉवरसुद्धा आहे.
या मोटरसायकलमध्ये सिक्य स्पीड गियरबॉक्सबरोबर जोडले गेले आहे. ब्रेक ब्रेम्बो आणि टॅक्शन कंट्रोल सिस्टीमसोबत कॉर्नरिंग एबीएससारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जोडली गेली आहे.
इंडियन परस्यूटची किंमत 28 लाखांपासून चालू होऊन 30 लाखांपर्यंत आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत ही मोटरसायकल भारतात येण्याची शक्यता आहे.