Indian Railways: ही आहेत 5 सर्वात विचित्र रेल्वे स्थानकांची नावं! तुम्ही ही नावं कधी ऐकलीत का?
भारतात हजारो रेल्वे स्थानके आहेत. त्यातल्या काहींची नावं वाचून आपल्याला हसू आवरणार नाही अशी नावं आहेत. ट्विटरवर @notnurseryrhyme नावाच्या एका अकाऊंटवर भारताच्या विचित्र रेल्वे स्टेशनची नावं विचारली, ज्यावर इंटरनेट युजरने त्यांच्या ओळखीच्या विचित्र स्थानकांची नावं सुचवली.
1 / 5
@notnurseryrhyme नावाच्या एका अकाऊंटवर भारताच्या विचित्र रेल्वे स्टेशनची नावं विचारली, ज्यावर इंटरनेट युजरने त्यांच्या ओळखीच्या विचित्र स्थानकांची नावं सुचवली. "कोमागाता मारू बज बज" रेल्वे स्थानक बझ शाखा मार्गावरील कोलकाता उपनगरी रेल्वे स्थानक आहे. हे भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे विभागातील सियालदाह रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहे. हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बजबज या स्थानिक भागाला सेवा देते.
2 / 5
"हलकट्टा रेल्वे स्थानक" भारतात हे स्थानक कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटकच्या वाडी शहरात असलेले हे रेल्वे स्थानक सेवालाल नगरपासून जवळच आहे. इथून दररोज अनेक गाड्या जातात. गुगलवर या रेल्वे स्थानकाविषयी अनेक रिव्ह्यूज आहेत. इथला आजूबाजूचा परिसर अतिशय हिरवागार असून लोकांना इथे भेट द्यायला आवडते.
3 / 5
"लेंडी खाना रेल्वे स्थानक" हे रेल्वे स्थानक स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. @IndiaHistorypic यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो 1930 च्या दशकात घेण्यात आला होता, जेव्हा भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर लेंडी खाना रेल्वे स्थानक अस्तित्वात होते. लेंडीखाना रेल्वे स्थानक तोर्खम पासून जवळच होते. ब्रिटिश राजवटीत २३ एप्रिल १९२६ रोजी याची स्थापना झाली. त्याचा फोटो आजही व्हायरल होत आहे.
4 / 5
"टिटवाळा रेल्वे स्थानक" हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्य मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे. कल्याण ते कसारा दरम्यानच्या मार्गावर हे स्थानक आहे. अंबिवली रेल्वे स्थानक हा मागील थांबा, तर खडावली रेल्वे स्थानक हा त्याचा पुढचा थांबा आहे.
5 / 5
"फफूंद रेल्वे स्थानक" उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात आहे. हे भारतातील ए श्रेणी रेल्वे स्थानक आहे. हे औरैया जिल्हा आणि दिबियापूर जिल्ह्याला सेवा देते. अलाहाबाद रेल्वे विभागाच्या कानपूर-दिल्ली या मार्गावरील हे एक मुख्य सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. ब्रिटिश राजवटीत बांधलेले हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून उत्तर मध्य रेल्वेद्वारे चालविले जाते. याला पाच ट्रॅक आणि चार प्लॅटफॉर्म आहेत.