फक्त सुशोभीकरणासाठी नाही तर आरोग्यासाठी लावल्या पाहिजेत घरात या 5 वनस्पती!

| Updated on: Sep 04, 2023 | 7:52 PM

इनडोअर वनस्पती म्हणजेच घरात सुशोभित करण्यासाठी ज्या वनस्पती ठेवल्या जातात त्या फक्त सुशोभीकरणासाठी उपयोगी नसतात. त्यांचे अनेक फायदे असतात. अशा वनस्पती आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात. कोणत्या अशा वनस्पती आहेत? जाणून घेऊया...

1 / 5
लैव्हेंडर: ही वनस्पती नुसती सुंदर नाही तर ही आरोग्याला सुद्धा खूप फायदेशीर आहे. या वनस्पतीमुळे चिंता कमी होते, तणाव दूर होतो. या वनस्पतीचा सुगंध इतका छान असतो की त्या सुगंधाने मन प्रसन्न राहते आणि झोप सुद्धा चांगली येते.

2 / 5
स्नेक प्लांट: स्नेक प्लांट हवा शुद्ध करते. या वनस्पतीला एक उत्कृष्ट एअर प्युरिफायर असं म्हटलं जातं. ही वनस्पती फॉर्मल्डिहाइड आणि बेंझीन सारखे विषारी पदार्थ हवेतून काढून टाकते. ही वनस्पती आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे.

3 / 5
सुंदर पांढऱ्या फुलांची पीस लिली वनस्पती. ही वनस्पती सुद्धा स्नेक प्लांट सारखीच हवा शुद्ध करते.  अमोनिया, बेंझीन आणि फॉर्मल्डिहाइड सारखे पदार्थ हवेतून काढून टाकते. ही वनस्पती फक्त सुशोभीकरणासाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे.

4 / 5
कोरफडीचे फायदे कोण नाकारेल? कोरफड अतिशय फायदेशीर आहे. कोरफड गराचे फायदे अनेक आहेत. कोरफड हवेची गुणवत्ता सुधारते. कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

5 / 5
फॉर्मल्डिहाइड आणि झायलीन सारखे प्रदूषक स्पायडर प्लांट हवेतून काढून टाकतात. ही वनस्पती बहुतेकांच्या घरात दिसून येते. या वनस्पतीमुळे आरोग्य चांगले राहते.