Marathi News Photo gallery Indore Amalner bus plunges into Narmada river; 13 people died; Rescue work is still going on Open in Google Translate • Feedback
Madhya pradesh bus accident : इंदोर अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळली;13 जणांचा मृत्यू, बचाव कार्य अद्याप सुरु
एनडीआरएफची टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. इंदूरचे आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी धार आणि खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
1 / 7
धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नर्मदा नदीत पडली आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 25 ते 27 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे, तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
2 / 7
प्रवाशांनी भरलेली महाराष्ट्र राज्य परिवहन बस नर्मदा नदीत पडली आहे. सकाळी 10.45 वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक होते. नदीतून आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
3 / 7
मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना 50 हजारांची मदत
4 / 7
पुलाचे रेलिंग तोडून बस थेट 25 फूट खाली नदीत पडली. खोलघाटच्या जुन्या पुलावर हा अपघात झाला.धामनोद पोलीस आणि खलटाका पोलीस घटनास्थळी दाखल होत मदत कार्यास सुरुवात केली आहे.
5 / 7
एनडीआरएफची टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. इंदूरचे आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी धार आणि खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
6 / 7
खलघाट येथे सकाळी झालेल्या बस अपघाताची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. बस दरीत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाला लवकरात लवकर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली आहे.
7 / 7
जिल्हा प्रशासन घटनास्थळी आहे. मुख्यमंत्र्यांनी एसडीआरएफ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याशिवाय घटनास्थळी आवश्यक साधनसामग्री पाठवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.