अभिषेक - ऐश्वर्या यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केले आहे. आज दोघे रॉयल आयुष्य जगत आहेत.
दुबईतील अभिषेक - ऐश्वर्या यांचं घर प्रचंड आलिशान आहे. सध्या त्यांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा दुबई येथील व्हिला जुमेराह गोल्फ इस्टेटच्या अभयारण्य फॉल्समध्ये आहे. दोघांचा बंगला प्रचंड आलिशान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबाच्या बंगल्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. बंगल्या सर्वप्रकारच्या सोयी-सुविधा आहेत...
डिझायनर किचन पासून होम थिएटर, स्विमिंग पूल देखील दोघांच्या बंगल्यात आहे. हा बंगल्या ऐश्वर्या - अभिषेक यांनी 2015 मध्ये विकत घेतला आहे.
अभिषेक बच्चन याची नेटवर्थ 280 कोटी रुपये आहे. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची नेटवर्थ 776 कोटी आहे. दोघे बॉलिवूडचे पॉव्हर कपल आहेत.
ऐश्वर्या - अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला.