चष्म्याबद्दल ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुमचेही डोळे उघडतील!
चष्मा लावणारे लोक अनेक कारणांमुळे चष्मा लावतात. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, स्टायलिश दिसण्यासाठी, स्क्रीनकडे बघून काम करताना त्रास होऊ नये म्हणून, अशी अनेक कारणं आहेत.
1 / 6
तेराव्या शतकात इटलीमध्ये पहिल्यांदा चष्मा दिसला होता. साल्व्हिनो देगली आर्मती (Salvino degli Armati) या व्यक्तीने चष्म्याचा शोध लावला असं म्हटलं जातं. याच व्यक्तीने हा चष्मा लावला होता.
2 / 6
पूर्वीच्या काळी जो व्यक्ती हा चष्मा लावायचा तो हुशार मानला जायचा. अशा लोकांची गणना विद्वानांमध्ये केली जायची. आजच्या काळात चष्मा असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. तेव्हा वाचन, अभ्यास जास्त असणाऱ्या लोकांनाच चष्मा असायचा.
3 / 6
सोळाव्या शतकात या चष्म्याची डिझाइन खूप इंटरेस्टिंग होती. हा चष्मा भिंगासारखा पकडला जायचा. याला दांड्या नसायच्या, म्हणजे आता जसा चष्मा आपण कानावर लावतो तशी डिझाइन पूर्वी नव्हती. हाताने हा चष्मा धरावा लागायचा.
4 / 6
नाकावरून चष्मा घसरून खाली यायचा, मग चष्मा बनवणारे स्पॅनिश लोकांनी त्यासाठी अनेक प्रयोग केले. चष्मा घसरू नये म्हणून ते लेन्सला रिबन लावायचे आणि ती रिबन कानामागे बांधायचे जेणेकरून ते लेन्स नाकावरून खाली घसरू नये.
5 / 6
१९२९ मध्ये गॉगलची निर्मिती सुरु झाली. याला सनग्लासेस म्हटलं जायचं कारण डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळावं यासाठी यांची निर्मिती केली गेली. अमेरिकन ब्रँड फोस्टर ग्रँटने अटलांटिक सिटी च्या समुद्रकिनाऱ्यांवर गॉगलची विक्री सुरु केली आणि हा गॉगल लोकांच्या पसंतीस पडला.
6 / 6
सुरवातीला गॉगल फक्त अशाच लोकांसाठी तयार केले गेले ज्यांना प्रकाशाचा त्रास होतो किंवा ज्यांचे डोळे संवेदनशील आहेत. पण नंतर याची लोकप्रियता बघता हळू हळू उत्पादन वाढत गेलं आणि मग गॉगल सर्वसामान्यांपर्यंत पोहचले.