चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त पेन्शन योजना, पती-पत्नीस मिळू शकतात 10,000 रुपये

| Updated on: Nov 24, 2024 | 5:08 PM

सरकारच्या अटल पेन्शन योजना (APY) मध्ये रोज फक्त चहाच्या एक कपाच्या किंमतीपेक्षा कमी गुंतवणूक करा. 7 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला 5,000 रुपयांचे मासिक पेन्शन मिळवू शकते. या योजनेचे देशभरात 7 कोटींहून अधिक सदस्य आहेत. यासाठी नावनोंदणी कशी करावी? जाणून घ्या...

1 / 6
दररोज सात रुपये वाचवून तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता का? अटल पेन्शन योजनेमुळे हे शक्य झाले आहे. ही सरकारी योजना आहे. ज्या लोकांना नियमित पेन्शन मिळणार नाही, त्यांच्यासाठी ही योजना पर्याय नाही. दररोज फक्त 7 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीसह ही योजना सुरु करता येते. त्यामुळे मासिक 5,000 रुपये मिळण्याची हमी मिळते.

2 / 6
अटल पेन्शन योजना (APY) कमी गुंतवणुकीत मोठ्या परताव्याची हमी देते. या योजनेत गुंतवलेली रक्कम तुमचे वय आणि निवडलेल्या पेन्शन पर्यायावर अवलंबून असते. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना सुरु केली आणि  5,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय घेतला तर रोज केवळ सात रुपये म्हणजे महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील.

3 / 6
पती-पत्नी दोघेही या योजनेचे स्वतंत्र सदस्य होऊ शकतात. त्यामुळे घरात एकूण पेन्शन दरमहा 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन येऊ शकते. याशिवाय आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभही उपलब्ध आहे. ही योजना केवळ पेन्शनच नाही तर कर बचतीसाठी चांगली आहे.

4 / 6
अटल पेन्शन योजनेची नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आहे. या योजनेसाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. मग आवश्यक कागदपत्रे आणि मोबाइल नंबर द्या. यानंतर, खात्यातून तुमची मासिक ऑटो-डेबिट सेट केले जाईल.

5 / 6
अटल पेन्शन योजना केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही तर कुटुंबाला सुरक्षिततेची भावना देखील देते. योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळते. दोघांच्या मृत्यूनंतर जमा केलेली रक्कम नामांकित व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते.

6 / 6
2015-16 मध्ये सुरू झालेली अटल पेन्शन योजना आज देशभर लोकप्रिय होत आहे. केवळ 2024-25 या आर्थिक वर्षात 56 लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले आहेत. कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही योजना आकर्षक बनली आहे.