IPL 2022: ‘या’ पाच कारणांमुळे रवींद्र जाडेजाने सोडली CSK ची कॅप्टनशिप
IPL 2022 च्या पहिल्या हाफमध्ये एमएस धोनीने रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली. पण दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे.
1 / 5
IPL 2022 च्या पहिल्या हाफमध्ये एमएस धोनीने रवींद्र जाडेजाकडे कॅप्टनशिप सोपवली. पण दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. आता प्रश्न हा आहे की, पुन्हा धोनीकडे कॅप्टनशिप का आली? यामागे पाच कारणं आहेत.
2 / 5
धोनीकडे सीएसकेची कॅप्टनशिप जाण्याचं पहिलं कारण आहे, सीएसकेचा खराब खेळ. पॉइंटस टेबलमध्ये सीएसकेचा संघ 9 व्या स्थानावर आहे. आठ पैकी फक्त दोन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.
3 / 5
दुसरं कारण आहे, रवींद्र जाडेजाचा स्वत:चा परफॉर्मन्स घसरलाय. जाडेजा एक चांगला ऑलराऊंडर आहे. CSK ला त्याने स्वबळावर अनेक विजय मिळवून दिलेत. पण यंदाच्या सीजनमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांमध्ये तो फ्लॉप आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यात त्याने फक्त 112 धावा आणि पाच विकेट घेतल्यात.
4 / 5
जाडेजाने पुन्हा धोनीकडे कॅप्टनशिप सोपवण्यामागचं कारण आहे, त्याला आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे. त्याला CSK च्या विजयात महत्त्वाचं योगदान द्यायचं आहे. कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या खेळात घसरण दिसली.
5 / 5
CSK साठी IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या सर्व आशा अजूनही मावळलेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आलय. जेणेकरुन संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल.