IPL 2022: ‘असं वाटलं, पीचवर बसतोय’, समजून घ्या अश्विनच्या ‘त्या’ विचित्र स्टान्सचा फायदा
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अश्विनने आपल्या वेगळ्याच स्टान्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. राजस्थान रॉयल्ससाठी अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
1 / 5
IPL 2022 स्पर्धेत अश्विन आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेत आहेच. पण आता त्याला त्याच्या स्टान्समुळेही प्रसिद्धी मिळतेय. काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अश्विनने असाच विचित्र स्टान्स घेतला होता.
2 / 5
दिल्लीचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव बॉलिंग करत होता. त्यावेळी अश्विन खूपच खाली वाकला. जणू असं वाटलं की, तो खेळपट्टीवरच बसतोय. वेगवान गोलंदाजांना खेळतानाही अश्विनने असाच स्टान्स घेतला. कुलदीपच्या गोलंदाजीवर त्याच स्टान्सने त्याने षटकारही ठोकला.
3 / 5
अश्विनने असा विचित्र स्टान्स का घेतला? त्याचे काय फायदे आहेत, ते बिहारचा कॅप्टन आशुतोष अमनने सांगितलं. आशुतोष अमनने सुद्धा IPL 2022 साठी नाव नोंदवलं होतं.
4 / 5
अश्विनने जो शॉट खेळला, त्यामुळे पावर जनरेट करायला मदत मिळते. स्पिनर आणि वेगवान गोलंदाज दोघांविरोधात फलंदाज हा स्टान्स घेऊ शकतो.
5 / 5
काल अश्विनने अर्धशतक झळकावलं. पण गोलंदाजीत तो विशेष कमाल करु शकला नाही. त्याने चार ओव्हर्समध्ये 32 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाला नाही. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला.