IPL मध्ये कोणी विकत घेतलं असतं, तेव्हाही असंच बोलला असतास का? शाकिब अल हसनवर भडकले BCB अध्यक्ष

| Updated on: Mar 08, 2022 | 1:53 PM

IPL 2022: शाकिब राष्ट्रीय संघासाठी किती कटिबद्ध आहे? त्यावर नजमुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अलीकडेच शाकिबनं शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मी आता थकलो आहे, असं विधान केलं होतं.

IPL मध्ये कोणी विकत घेतलं असतं, तेव्हाही असंच बोलला असतास का?  शाकिब अल हसनवर भडकले BCB अध्यक्ष
शाकिब अल हसन
Image Credit source: instagram
Follow us on

ढाका: बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे (Bangladesh Cricket Board) अध्यक्ष नजमुल हसन (Nazmul Hasan) बांग्लादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसनवर (Shakib Al hasan) नाराज आहेत. शाकिब राष्ट्रीय संघासाठी किती कटिबद्ध आहे? त्यावर नजमुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अलीकडेच शाकिबनं शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मी आता थकलो आहे, असं विधान केलं होतं. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याऐवजी ब्रेक घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. शाकिबची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बांग्लादेशच्या संघात निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्याने ब्रेक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरुनच नजमुल हसन यांनी शाकिबला सुनावलं आहे.
आयपीएलमुळे मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही, असं शाकिबने आधी म्हटलं होतं. पण आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कुठल्याही फ्रेंचायजीने त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे बांग्लादेशकडून खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. शाकिबचा तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. पण रविवारी शाकिबने सतत क्रिकेट खेळून त्रास होत असल्याचा मुद्दा मांडला.

नजमुलने प्रश्न उपस्थित केले

बीसीबीच्या चेयरमनला शाकिबचा हा स्वभाव आवडला नाही. त्यांनी थेट प्रश्न विचारला. उद्या आयपीएलमध्ये निवड झाली असती, तेव्हाही शाकिब असंच बोलला असता का?. आयपीएलमध्ये निवड झाली असती, तर आता मला मानसिक थकवा आला आहे असं बोलला असतास का? असा थेट सवाल नजमुल यांनी विचारला.

शेवटच्या क्षणी सांगितल्याने अडचण

शाकिब उपलब्ध नाही, म्हणून मला काही त्रास नाहीय. पण ही गोष्ट त्याने शेवटच्या क्षणी सांगायला नको होती, असं त्यांचं म्हणणं आहे. “तुम्हाला खेळायचं नसेल, तर आम्हाला सांगा. पण शेवटच्या क्षणाला तुम्ही सांगितलं, तर अडचणी वाढतात. आम्ही दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं नियोजन शाकिबला विचारात घेऊनच केलं होतं. आता शाकिब असं म्हणत असेल, तर केलेल्या प्लानिंगवर त्याचा परिणाम होणार. कोचिंग स्टाफचे सदस्य आणि सपोर्ट स्टाफला काय चाललय हे माहितच नाही” असे नजमुल म्हणाले.