Marathi News Photo gallery Ipl 2022 deepak chahar injury rajvardhan hangargekar is the best option for ms dhoni chennai superkings
IPL 2022: दीपक चाहरच्या दुखापतीमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूला लॉटरी, धोनी स्वत: त्या हिऱ्याला पैलू पाडणार?
IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सनो मोठी किंमत मोजून दीपक चाहरला (Deepak chahar) 14 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. टॅलेंट असल्यामुळेच चेन्नईने या खेळाडूवर इतके पैसे खर्च केले.
1 / 5
IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने मोठी किंमत मोजून दीपक चाहरला (Deepak chahar) 14 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. टॅलेंट असल्यामुळेच चेन्नईने या खेळाडूवर इतके पैसे खर्च केले. दीपक चाहर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान देण्याची त्याची क्षमता आहे. आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपरकिंग्सला एक धक्का लागला आहे. दीपक चाहर दुखापतीमुळए आयपीएलच्या अनेक सामन्यांना मुकू शकतो. (PC-PTI)
2 / 5
दीपक चाहरचं संघाबाहेर होणं ही चेन्नईसाठी एक वाईट बातमी आहे. पण धोनीच्या टीमकडे चाहरला पर्याय आहे. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये धोनीने अशा एका खेळाडूला विकत घेतलं आहे, जो उत्तम गोलंदाजीबरोबर दमदार फलंदाजीही करु शकतो. (PC-BCCI)
3 / 5
उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरला चेन्नईने ऑक्शनमध्ये 1.5 कोटी रुपयात विकत घेतलं आहे. राजवर्धन नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याशिवाय आठव्या क्रमांकावर उतरुन आक्रमक फलंदाजीही करु शकतो. याचा ट्रेलर त्याने अंडर 19 वर्ल्डकपमध्येही दाखवला आहे. (PC-ICC)
4 / 5
राजवर्धन हंगरगेकरने अंडर 19 वर्ल्डकपच्या सहा सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट प्रतिषटक चार धावा होता. त्याशिवाय त्याने 26 च्या सरासरीने धावाही केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 185.71 होता. (PC-ICC)
5 / 5
हंगरगेकर तुफानी हिटिंग करण्यासाठी ओळखला जातो. त्याशिवाय त्याच्या गोलंदाजीचा वेग 140 किमी प्रतितासपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच हंगरगेकरला चेन्नईने आपल्या संघात विकत घेतलं आहे. (PC-ICC)