इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचं नेतृत्व करत आहे. आज गुजरातची पाचवी मॅच आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्यांचा सामना होत आहे. या मॅच आधी हार्दिकची बायको नताश स्टँकोविकचे काही फोटो चर्चेत आले आहेत.
नताशाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती व्हाइट बिकनी मध्ये दिसतेय.
नताशाने या फोटोंसोबत हाए गर्मी असं कॅप्शन लिहिलं आहे. नताशा फोटोत एका वॉटर पूलमध्ये दिसतेय.
नताशाची जाऊबाई पंखुडी शर्मा आणि सिंगर आस्था गिलने नताशाचे फोटो लाइक केले आहेत. इशांत शर्माची बायको प्रतिमा सिंह नताशाच्या फोटोवर कमेंट करताना तिला हॉटी म्हटलं आहे. जाऊबाई पंखुडीने फायरचा इमोजी पोस्ट केलाय.
नताशा सध्या पती हार्दिक पंड्यासोबत मुंबईमध्ये आहे. मॅचच्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित राहून ती गुजरात टायटन्सला चिअर करताना दिसते.
अलीकडे SRH विरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकचा चेंडू हार्दिकच्या हेल्मेटला लागला त्यावेळी नताशा अस्वस्थ झाली होती.
हार्दिकला चेंडू लागला त्यावेळी नताशा प्रेक्षक स्टँडमध्ये उपस्थित होती. ती अस्वस्थ दिसली. पण हार्दिकने लगेच स्वत:ला सावरत खेळ सुरु केला.
एकवर्ष डेट केल्यानंतर हार्दिक आणि सर्बियाई मॉडेल नताशाने मार्च 2020 मध्ये लग्न केलं. फक्त कुटुंबातील सदस्य या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. जुलै 2020 मध्ये नताशाने मुलगा अगस्त्याला जन्म दिला.
काही दिवसांपूर्वी नताशा स्टँकोविक पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यामागे कारण आहे, तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला स्विमिंग पूलमधला व्हिडिओ. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नताशाचा या व्हिडिओत हॉट लूक दिसतोय.