IPL 2022 मध्ये कॉमेंटेटर्स होणार मालामाल, हर्षा भोगले ते सुनील गावस्कर जाणून घ्या दिग्गजांची ‘फी’
IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये पहिला सामना होत आहे.
1 / 10
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये पहिला सामना होत आहे.
2 / 10
आयपीएलमध्ये एकूण दहा टीम्स असून 80 कॉमेंटेटर्सची टीम तयार आहे. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेत वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन होणार आहे. यामुळे अनेक कॉमेंटेटर्स मालामाल होणार आहेत.
3 / 10
IPL 2022 मध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांच्या यादीत अनेक दिग्गज नाव आहेत. हर्षा भोगले, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, सुरेश रैना, आकाश चोप्रा, इरफान पठाण सारखे खेळाडू कॉमेंट्री करताना दिसतील. या सर्वांना कॉमेंट्री करण्यासाठी किती रक्कम मिळते, ते जाणून घ्या...
4 / 10
स्टार नेटवर्कने कॉमेंट्रीसाठी 80 कॉमेंटेटर्सची टीम तयार केली आहे. आठ वेगवेळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे. स्टार नेटवर्कच्या दोन डझन चॅनल्सवर सामने दाखवले जातील. डिज्नी-हॉट स्टारवरही स्ट्रीमिंग होईल.
5 / 10
sportingfree.com नुसार, आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या स्टार्सना कोट्यवधींची फी मिळते. इंग्लिश कॉमेंट्री करणारे जास्त पैसे कमावतात. संपूर्ण सीजनमध्ये त्यांची फी 1.9 कोटी ते 4 कोटीच्या दरम्यान असते.
6 / 10
हर्षा भोगले, इयान बिशप, सुनील गावस्कर, केविन पीटरसन, माइकल स्लेटर, साइमन डुल, डॅनी मॉरिसन या सारख्या मोठ्या कॉमेंटेटर्सना पांच लाख डॉलर्स पर्यंत फीस घेतात. हे सर्व इंग्रजी कॉमेंट्री टीमचा भाग आहेत.
7 / 10
हिंदी कॉमेंट्री करणाऱ्यांमध्येही मोठी नाव आहेत. ते 70 लाख ते तीन कोटी दरम्यान फी घेतात. आकाश चोप्राची फी सर्वात जास्त साडेतीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे अडीच कोटी पेक्षा पण जास्त.
8 / 10
आकाश चोप्राशिवाय इरफान पठान, गौतम गंभीर या कॉमेंटेटर्सची फी दोन लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
9 / 10
सुरेश रैना आणि रवी शास्त्री हिंदी कॉमेंट्री टीमचा भाग असणार आहेत. हे दोघे सुद्धा मोठी रक्कम घेतील.
10 / 10
सुरेश रैनाला ऑक्शनमध्ये कुठल्याही टीमने विकत घेतलं नाही. तो पहिल्यांदाच कॉमेंट्री करतोय. रवी शास्त्री सहा वर्षानंतर कॉमेंट्री करताना दिसणार आहे.