IPL 2022 च्या प्लेऑफ शेड्यूल आणि वेन्यूची घोषणा झाली आहे. आयपीएलचे दोन प्लेऑफ सांमने कोलकातामध्ये होतील. दुसरा क्वालिफायर आणि आयपीएल फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे.
BCCI ने महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेची घोषणा केली आहे. महिलांचे टी 20 सामने 23 मे पासून पुण्यात होणार असून फायनल 28 मे रोजी तिथेच होईल.
बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार, आयपीएल क्वालिफायरचा पहिला सामना 24 मे रोजी कोलकाता येथे होणार आहे. पॉइंटस टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये पहिला क्वालिफायरचा सामना होईल.
पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटरची मॅच होईल. 25 मे रोजी कोलकात्यात हा सामना होईल. 27 मे रोजी क्वालिफायर दोन आणि 29 मे रोजी फायनल होईल. दोन्ही सामने अहमदाबादमध्ये होतील.
आयपीएल 2022 दरम्यान महिला टी 20 चॅलेंजचेही सामने होतील. हे सर्व सामने पुण्यातच होणार आहेत. 23 मे रोजी स्पर्धेला सुरुवात होईल. 28 मे रोजी अंतिम लढत रंगेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हे सामने सुरु होतील.