Rishabh Pant IPL 2022 DC vs RR: मैदानातच ऋषभवर भडकले शेन वॅटसन, पंतने गुपचूप मान खाली घालून सर्व ऐकलं
Rishabh Pant IPL 2022 DC vs RR: IPL 2022 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. या मॅचच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला.
1 / 10
IPL 2022 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. या मॅचच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला.
2 / 10
हा वाद इतका वाढला की, कॅप्टन ऋषभ पंतने क्रीझवर असलेल्या खेळाडूंना माघारी बोलावलं. मॅचच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोव्हमॅन पॉवेलने सिक्स मारला.
3 / 10
हा चेंडू फुलटॉस होता व कमेरच्या उंचीचा होता. दिल्लीच्या संघाच्या मते हा नो बॉल होता. पण पंचांच्या मते हे योग्य चेंडू होता. त्यांनी नो बॉल दिला नाही.
4 / 10
पंतला पंचांचा हा निर्णय मान्य नव्हता. वाद इतका वाढला की, ऋषभ पंतने क्रीझवर असलेल्या फलंदाजांना माघारी बोलावलं. ऋषभचा हा आक्रमक अंदाज सहाय्यक कोच शेन वॅटसन यांना पटला नाही.
5 / 10
शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. रोव्हमॅन पॉवेल स्ट्राइकवर होता.
6 / 10
त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले. त्यामुळे दिल्लीच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. पण त्यावरुन बराच वाद झाला.
7 / 10
पंत डनआउटमध्ये सीमारेषेवर उभा राहून चौथ्या पंचांशी बोलत होता. नो बॉल दिला पाहिजे, असं पंतच म्हणणं होतं.
8 / 10
मैदानावर पॉवेल आणि कुलदीप यादवही पंचांशी बोलत होते. पंतने आपल्या खेळाडूंना माघारी बोलावलं. ते पाहताच वॅटसन जागेवरुन उठले व पंतशी बोलायला लागले.
9 / 10
वॅटसनने पंतला काही गोष्टी सुनावल्या. पंत शेन वॅटसन यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता व सर्व गोष्टी गुपचूप ऐकत होता.
10 / 10
त्यानंतर ऋषभने कुलदीप आणि पॉवेलला माघारी बोलावलं नाही. सामना पूर्ण होईपर्यंत खेळू दिलं.