राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईकडून जडेजाने दोन बळी घेतले. जडेजाने आपल्या T20 कारकिर्दीत 200 बळी आणि 2000 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. (Photo - Twitter / IPL)
सीएसकेकडून खेळताना रवींद्र जडेजाने राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली. देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांची विकेट घेत त्याने ही कामगिरी केली. (Photo - Twitter / IPL)
टी 20 मध्ये 200 हून अधिक विकेट घेणारा जडेजा हा भारताचा नववा गोलंदाज आहे. जडेजा हा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे ज्याने T20 मध्ये 200 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे. (Photo - Twitter / IPL)
रवींद्र जडेजा याच्या आधी आठ गोलंदाजांनी T20 मध्ये 200 विकेट घेतल्या आहेत. मात्र T20 मध्ये 2000 धावा केल्या नाहीत. (Photo - Twitter / IPL)
जडेजाने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 296 सामने खेळले आहेत. त्याने 3198 धावा केल्या आहेत. तसेच 200 विकेट्स घेतल्या. जडेजाने टी-20मध्ये एकदा 5 तर 3 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo - Twitter / IPL)
जडेजाने आयपीएलमध्ये 214 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 138 विकेट घेतल्या आहेत आणि 2531 धावा केल्या आहेत. (Photo - Twitter / IPL)