IPL 2023 : चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली याला ‘ती’ चूक भोवली, बीसीसीआयने केलं असं की..
RCB vs CSK IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना अतितटीचा झाला. पण अखेर चेन्नईने या सामन्यात बाजी मारली. पण सामन्यानंतर विराट कोहली याला बीसीसीआयने दणका दिला आहे.
1 / 6
चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर रंगतदार झालेल्या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीला चेन्नईकडून घरच्या मैदानात पराभव स्वीकारावा लागला. (Photo : BCCI/IPL )
2 / 6
आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. यावेळी चेन्नईच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. मात्र क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीचा आक्रमक पवित्रा दिसून आला. याच कृतीचा त्याला फटका बसला आहे. (Photo : BCCI/IPL )
3 / 6
या सामन्यात शिवम दुबेने वादळी खेळी केली. चौकार षटकारांची आतषबाजी सुरु होती. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू अस्वस्थ झाले होते. पण जेव्हा शिवम दुबेची विकेट केली तेव्हा विराटने वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेशन केलं. आता बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला आहे. (Photo : BCCI/IPL )
4 / 6
आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कोहलीला मॅच फीच्या 10 टक्के टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीने आयपीएलच्या आचारसंहितेच्या 2.2 अंतर्गत प्रथम श्रेणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. (Photo : BCCI/IPL )
5 / 6
स्फोटक फलंदाजी करत धावांचा वर्षाव करणाऱ्या शिवम दुबे याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. वेन पारनेलच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने त्याचा झेल घेतला. तेव्हा कोहलीने आक्रमक सेलिब्रेशन केले. (Photo : BCCI/IPL )
6 / 6
आरसीबीने हा सामना 8 धावांनी गमावला. चेन्नईने दिलेल्या 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने सुरुवातीलाच कोहलीची विकेट गमावली पण मॅक्सवेल (76) आणि डुप्लेसिस (62) यांनी स्फोटक फलंदाजी करत सामना विजयाच्या वेशीपर्यंत आणला. (Photo : BCCI/IPL )