विराट कोहलीच्या आरसीबीनं आतापर्यंत 1003.7 कोटी रुपये खर्च केले आहे. पण एकही किताब जिंकलेला नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आरसीबीनंतर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. खेळाडूंवर 978.3 कोटी रुपये खर्च केले आहेत.मुंबईने पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. (Photo- IPL)
कोलकाता नाईट राईडर्स तिसऱ्या स्थानावर असून 939.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोलकात्याने 2012 आणि 2014 असं दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने 918.7 कोटी खर्च केले असून एकही किताब जिंकलेला नाही. (Photo- IPL)
पंजाबन किंग्स पाचव्या स्थानावर असून 860.9 कोटी खर्च केले आहेत. पंजाबलाही एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. तर चेन्नई सुपर किंग्सने 854.1 कोटी खर्च केले आहेत.चेन्नईने चारवेळा किताब पटकावला आहे. (Photo- IPL)
सनराईजर्स हैदराबाद सातव्या क्रमांकावर असून 735.4 कोटी रुपये खर्च केले आहेत. आयपीएल 2016 चषक पटकावण्यात यश मिळालं आहे. राजस्थान आठव्या क्रमांकावर असून पहिला आयपीएल किताब पटकावला आहे. खेळाडूंवर 704.8 कोटी रुपये खर्च केले आहेत. (Photo- IPL)
लखनऊ सुपर जायन्स्टनं 179.8 कोटी खर्च केले आहेत. तर गुजराजने 174.3 कोटी खर्च करून पहिल्याच फटक्यात किताब जिंकला होता. (Photo- IPL)