इंडियन प्रिमियर लीगच्या 2022 (IPL 2022) च्या मोसमासाठी एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने (BCCI) शनिवारी ही माहिती दिली. (ALL Pic Credit IPL)
12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये ऑक्शन होईल.
1214 खेळाडुंपैकी 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू आहेत. "या खेळाडुंच्या यादीत 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 असोसिएट खेळाडू आहेत" असे बोर्डाने सांगितले.
270 कॅप्ड खेळाडुंपैकी 61 भारतीय आणि 209 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. अनकॅप्ड असलेले 143 भारतीय आणि सहा परदेशी क्रिकेटपटू मागच्या आयपीएल सीजनचा भाग होते.
यंदाच्या आयपीएलमध्ये टाटा ग्रुप इंडियन प्रिमियर लीगचे टायटल स्पॉन्सर असणार आहे.
लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर ही माहिती दिली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन फ्रेंचायजी आहेत.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय यंदा कशा प्रकारे या स्पर्धेचे आयोजन करते, त्याची उत्सुक्ता आहे.