IRCTC चा नवा उपक्रम, मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावर पॉड हॉटेल, कमी पैशात वायफाय, एसी रुमसारखी सुविधा
IRCTC ने मुंबईमध्ये पॉड हॉटेलची सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने आईआरसीटीसीने ही सेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सुरु केली आहे. पॉड डिझाईन असलेलं भारतीय रेल्वेचं हे पहिलं-वहिलं रिटायरिंग हॉटेल आहे.
1 / 6
मुंबई : IRCTC ने मुंबईमध्ये पॉड हॉटेलची सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने आईआरसीटीसीने ही सेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सुरु केली आहे. पॉड डिझाईन असलेलं भारतीय रेल्वेचं हे पहिलं-वहिलं रिटायरिंग हॉटेल आहे. भारतीय रेल्वे क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग असून तो मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावर राबवला जातोय.
2 / 6
या पॉड हॉटेलसाठी IRCTC ने खुली नविदा प्रक्रिया राबवली. या निविदेंतर्गत 9 वर्षांसाठी पॉड कॉन्सेप्ट रिटायरिंग रूमची स्थापना, चालवणे आणि त्याचे व्यवस्थापन केले जाईल. हे टेंडर 3 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. पॉड हॉटेलची ही सुविधा मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्थानकावरील पहिल्या माळ्यावर करण्यात आली असून ही हॉटेल जवळपास 3000 स्क्वेअर फुटामध्ये पसरलेली आहे.
3 / 6
पॉड हॉटेलची रचना एका कॅप्सूल हॉटेलप्रमाणे आहे. अशा प्रकारचे हॉटेल सर्वात आधी जपानमध्ये विकसित केली गेले होते. अशा हॉटेलमध्ये लहान बेडच्या आकाराच्या रुम असतात. अशा रुम्सची ठेवण ही कॅप्सूलसारखी असते. ज्या लोकांना महागड्या हॉटेल्समध्ये राहणे परवडणारे नाही, अशा लोकांसाठी पॉड हॉटेल वरदान ठरणार आहे.
4 / 6
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या या पॉड हॉटेलमध्ये फ्री वाय-फाई, लगेज रूम, टॉयलेटरीज, शॉवर रूम, वॉशरूम उपलब्ध आहे. तसेच गेस्ट टीव्ही, छोटे लॉकर, मिरर, अॅडजस्टेबल एअर कंडीशन आणि एअर फिल्टर वेंट, रीडिंग लाइट या सुविधासुद्धा देण्यात आल्यायत. यामध्ये इंटीरियर लाइट, मोबाईल चार्जिंग, स्मोक डिटेक्टर, डीएनडी इंडिकेटर आदी सुविधा प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
5 / 6
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा एक गेमचेंजर ठरणार आहे, असा दावा आयआरसीटीसीने केलाय. जे लोक व्यवसायानिमित्त यात्रेवर असतात, कॉर्पोरेट अधिकारी, एकटा यात्रेकरू यांच्यासाठी हे पॉड हॉटेल वरदान ठरणार अल्याचेही आयआरसीटीसीने सांगितलंय.
6 / 6
लोकांना परवडेल असे या पॉड हॉटेलचे चार्जेस ठेवण्यात आले आहेत. 12 तासांसाठी 999 रुपये प्रतिव्यक्ती. 24 तासांसाठी प्रति व्यक्ति 1999 रुपये फी असेल. तसेच क्लासिक पॉड्स, फक्त महिलांसाठी, प्राइव्हेट पॉड्स आणि डिफरेंटली एबल्डसाठी देखील विशेष पॉडची येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे.