लोकांनी धाव घेतली, उद्ध्वस्त गावात पायवाटेने माणुसकी पोहचली…बचावकार्याचे Photo!

| Updated on: Jul 20, 2023 | 9:24 AM

या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की लोकं या पायवाटेने सुद्धा मार्ग काढत मदतीसाठी पोहचतायत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही पथकं, जवान आणि नागरिक एकजुटीने कार्यरत आहेत.

1 / 10
रायगडमधल्या खालापूरमध्ये दरड कोसळ्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावावर ही दरड कोसळली आहे. इर्शाळ गडाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे.

2 / 10
चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत.

3 / 10
या गावात जाण्यासाठी पायवाट आहे. या पायवाटेने लोकं तिथे मदतकार्यासाठी जात आहेत. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांच्यासहित नागरिक सुद्धा पुढे सरसावले आहेत. कसलाही विचार न करता या गावात नागरिक मदतीसाठी पोहचतायत.

4 / 10
या गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे तिथे यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणं तिथं पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने NDRF कडून बचावकार्य केलं जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

5 / 10
या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की लोकं या पायवाटेने सुद्धा मार्ग काढत मदतीसाठी पोहचतायत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही पथकं, जवान आणि नागरिक एकजुटीने कार्यरत आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की लोकं या पायवाटेने सुद्धा मार्ग काढत मदतीसाठी पोहचतायत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही पथकं, जवान आणि नागरिक एकजुटीने कार्यरत आहेत.

6 / 10
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं हे गाव एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालंय!  प्रशासन आणि नागरिक मिळून हे मदतकार्य करत आहेत.

7 / 10
रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. घटनास्थळी शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

8 / 10
NDRF च्या दोन टीम, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि इतर गावातील रहिवासी मदतकार्य करत आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

9 / 10
या लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

10 / 10
तसेच या ठिकाणी एक पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आला आहे. तसेच पीडीत कुटुंबीयांच्या नातेवाईकांसाठी आणि पीडितांसाठी या ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.