चिकनचा रंग : तुम्ही जेव्हा ताजं चिकन विकत घेता तेव्हा त्याचा रंग गुलाबी आणि मांसाल असतं. पण जेव्हा चिकन खराब होतं तेव्हा त्याचा रंग फिका पडतो. जर एकदमच राखाडी पडलं असेल तर ते गरजेपेक्षा जास्त खराब असल्याचं समजून जा.
चिकनचा चिकटपणा : चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल तर समजून जा चिकन खराब आहे. चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर समजून जा चिकन खूपच खराब आहे.
चिकनचा वास : ताज्या चिकनला अतिशय सौम्य वास किंवा येत नाही. पण खराब चिकनला उग्र वास योते. कुजलेल्या अंड्यासारखा किंवा गंधयुक्त वास येत असेल तर समजून जा चिकन खराब आहे.
चिकनची चव : ताज्या आणि गोठवलेल्या चिकनची चव खूपच वेगळी असते. त्यामुळे तुम्ही चिकन खात असाल तर तुम्हाली ही बाब लक्षात येईल. तर तुम्हाला खाताना तसं काही जाणवलं तर ते चिकन खाऊ नका.