पुस्तकांचा बगीचा! वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘या’ शहराचा अनोखा उपक्रम…

| Updated on: Nov 03, 2023 | 12:29 PM

वाचन वाढावं, वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून नवनवीन उपक्रम केले जातात. यासाठी एका शहराने एक अनोखा उपक्रम केलाय. हा उपक्रम इतका अनोखा आहे की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. आपण वेगवेगळे बगीचे बघतो पण कधी पुस्तकांचा बगीचा पाहिलाय का? या शहराने पुस्तकांचा बगीचा तयार केला आहे.

1 / 5
book garden jalgaon

book garden jalgaon

2 / 5
आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र जळगावातील एरंडोल नगरपरिषदेने तब्बल एक एकर जागेवर पुस्तकाचा बगीचा साकारला आहे.

3 / 5
वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार असून एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहीलाच प्रयोग आहे. हा  बगीचा राज्यातला पुस्तकांचा एकमेव बगीचा ठरला आहे.

4 / 5
एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती करण्यात आलीये. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

5 / 5
या गार्डन मधे  कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे एकूण एक हजारांपेक्षा जास्त पुस्तक उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला आहे.