कुपवाडा इथे शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा. सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण सोहळा.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. भारत-पाक सीमेवर स्थापित होणार छत्रपती शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.
जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आज उभारण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जम्मू- कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत हा अनावरण समारंभ संपन्न झाला. कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन करण्यात आले
"आम्ही पुणेकर" या सामाजिक संस्था आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सीमेवर छत्रपती शिवरायांचा पहिलाच पुतळा स्थापित झाला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय रायफल्स-41 चे जवान अतिशय उत्साहित असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत होते. मागील आठवड्यात हा पुतळा जेव्हा या परिसरात दखल झाला तेव्हा जवानांनी ढोल ताशे आणि झांज वाजवून जल्लोषात स्वागत केले.