JHUND MOVIE PRIMIER SHOW | नागराज मंजुळेंच्या गुणवत्तेला प्रमाणपत्राची गरज नाही, नितीन गडकरींकडून मंजुळेंचं कौतुक
झुंड चित्रपटाचा प्रीमियर शो रविवारी नागपुरात ठेवण्यात आला होता. यासाठी झुंड चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्यासह टीमचे कलाकार यावेळी उपस्थित होते. झुंडची पूर्ण टीम नागपुरात दाखल झाल्यानं संपूर्ण टीमची जल्लोषात खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोलताशांच्या गजरात स्वागतही करण्यात आले. नागपुरात झालेला हा प्रीमीयश शो मोठ्या दिमाखात झाला. या प्रीमियरला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती.
-
-
नागराज मंजुळेंच्या गुणवत्तेला प्रमाणपत्राची गरज नाही, नितीन गडकरींकडून मंजुळेंचं कौतुक, ‘झुंड’च्या टीमचं नागपुरात दिमाखात स्वागत केलं.
-
-
‘झुंड’ची पूर्ण टीम नागपुरात दाखल झाल्यानं संपूर्ण टीमची जल्लोषात खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोलताशांच्या गजरात संपूर्ण टीमचे स्वागत करण्यात आले.
-
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागराज मंजुळेंचं कौतुक करताना म्हणतात, नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. आउट ऑफ बॉक्स विचार करून सुंदर चित्रपटाच निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे यांनी स्वतःच्या कामाला सिद्ध केले आहे. गडकरींनी केलेल्या कौतुकानंतर नागराज मंजुळेंनी त्यांचे आभार मानले.