अभिषेक-ऐश्वर्यालाच्या लग्नाबद्दल सवाल; काजोलने दिला खास सल्ला, म्हणाली “कधीच..”

| Updated on: Apr 04, 2024 | 3:12 PM

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रॅपिड फायर राऊंडदरम्यान काजोलला अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.

1 / 6
अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काजोलच्या मनात जे असतं ते तिच्या ओठांवर येतं. विषय कोणताही असो ती त्यावर मनमोकळेपणे बोलते. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 6
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि काजोल यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. करणच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये काजोलने अनेकदा हजेरी लावली. याच शोमधील तिचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.

3 / 6
या चॅट शोमध्ये काजोलने अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना लग्नाबद्दल एक सल्ला दिला होता. या एपिसोडमध्ये काजोलसोबत अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसुद्धा उपस्थित होते.

4 / 6
करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये काजोलला विचारलं, "अभिषेक आणि ऐश्वर्याला लग्नाबद्दल कोणता सल्ला देशील?" या प्रश्नाचं उत्तर देताना काजोल म्हणाली, "कभी अलविदा ना कहना हा चित्रपट कधीच पाहू नका, असा सल्ला मी त्यांना देईन." काजोलचं हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले होते.

5 / 6
करणने हाच प्रश्न शाहरुख खानलाही विचारला. त्यावर किंग खान म्हणाला, "मी असा सल्ला देईन की तुमचा संसार मिस्टर आणि मिसेस बच्चन यांच्यासारखंच यशस्वी बनवा."

6 / 6
कभी अलविदा ना कहना हा करण जोहरचाच चित्रपट होता. ज्यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विवाहबाह्य संबंधाविषयी हा चित्रपट होता.