‘सीरियलमध्ये रोल हवा म्हणून इथे कोणाला सेक्स…’, हिंदी मालिकांमधली प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली
आज छोट्या पडद्यावरुन कलाकार घराघरात पोहोचले आहेत. या कलाकारांची लोकप्रियता आहे. पण बॉलिवूड, मॉलिवूडप्रमाणे TV इंडस्ट्रीमध्ये लैंगिक शोषण होत का?. प्रसिद्ध अभिनेत्रीने यावर मौन सोडलं आहे.
-
-
मल्याळच चित्रपट सृष्टीतील ‘Me Too’ मूवमेंटने एंटरटेनमेन्ट विश्वाला हादरवून सोडलय. या दरम्यान लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मत व्यक्त केलं आहे.
-
-
टेलीविजन महिलांसाठी खूपच क्लीन मीडियम आहे. टीव्ही इंडस्ट्री महिलांसाठी सुरक्षित असल्याच अभिनेत्री काम्या पंजाबीने म्हटलं आहे. टेलीविजन खूप क्लीन प्लॅटफॉर्म आहे. मला माहित नाही आधी इथे काय चालायच पण आता खूप सेफ आहे, असं काम्याने म्हटलय.
-
-
इथे लोकांवर जबरदस्ती किंवा कुठल्या गोष्टीसाठी भाग पाडलं जात नाही. इथे कास्टिंग काऊच नाहीय. तुम्ही रोलमध्ये फिट बसताय, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तर तुमची शो साठी निवड होईल.
-
-
मी अशा लोकांना ओळखते, त्यांच्यासोबत हे सर्व घडलय असं त्यांचं म्हणण आहे. पण मला माहितीय एका मुलीची इच्छा नसेल, तर तिच्यासोबत असं काही होणार नाही. मला चित्रपट, ओटीटी बदद्ल माहिती नाही हे टीव्हीमध्ये येत नाही.
-
-
मला वाटतं एंटरटेनमेन्ट इंडस्ट्रीत टेलीविजन सर्वात सुरक्षित आहे. इथे तुम्ही सेक्सुअल अब्यूज होत नाही. इथे जे काही होतं, ते परस्पर सहमतीने होतं. इथे रोल देण्याच्या बदल्यात कोणी सेक्स करायला सांगत नाही.