चार वर्षात हिटच्या नावाने बोंब, कंगना राणावत घेणार मोठा निर्णय?
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. कंगना राणावत हिचा नुकताच तेजस हा चित्रपट रिलीज झालाय.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने एक मोठा काळ नक्कीच बाॅलिवूडमध्ये गाजवला. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
2 / 5
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत हिचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहे. एका हिट चित्रपटासाठी कंगना मेहनत करताना दिसत आहे. मात्र, सतत फ्लाॅप चित्रपट जात आहेत.
3 / 5
2015 ला कंगना राणावत हिचा रिलीज झालेला तनु वेड्स मनु हा चित्रपट हिट ठरला. मात्र, त्यानंतर कंगना राणावत हिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही.
4 / 5
2019 मध्ये रिलीज झालेला मणिकर्णिका या चित्रपटाने ठिक कमाई केली. पंगा चित्रपट तर फ्लाॅपच गेला. थलायवी चित्रपटाचे तेच हाल बघायला मिळाले. मेंटल है क्या चित्रपटालाही धमाका करता आला नाही.
5 / 5
धाकड चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. मात्र, तो देखील फ्लाॅप गेला. चंद्रमुखी चित्रपटालाही धमाका नाही करता आला. आताच रिलीज झालेल्या तेजस पण फार काही कमाई करू शकला नाहीये.