अरेच्चा! शाहिद-करीनाला एकत्र पाहून चाहते खुश; म्हणाले Jab They Met

| Updated on: Dec 20, 2024 | 9:09 AM

अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर एकत्र दिसल्याने चाहते खूपच खुश झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला होता.

1 / 5
अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी होती. या दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहतेसुद्धा बरेच नाराज झाले होते. मात्र आता बऱ्याच वर्षांनंतर शाहिद-करीना एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसले.

2 / 5
मुंबईतील धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमाला या दोघांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात. त्यामुळे वार्षिक कार्यक्रमाला असंख्य सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली.

3 / 5
या वार्षिक कार्यक्रमात करीना आणि सैफ अली खान ज्या रांगेच बसले होते, त्याच्या मागेच शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूतसोबत बसलेला दिसून आला. त्यामुळे आता या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
करीना आणि सैफची मुलं तैमुर आणि जहांगीर हे दोघं अंबानींच्या शाळेत शिकतात. तर शाहिद आणि मीराची मुलं मिशा आणि झैनसुद्धा याच शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे वार्षिक कार्यक्रमाला हे सर्व सेलिब्रिटी एकाच फ्रेममध्ये दिसले.

5 / 5
शाहिद आणि करीनाने 2000 साली एकमेकांना डेट करायाला सुरुवात केली होती. तर 2007 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करीनाने सैफशी 2012 मध्ये लग्न केलं आणि शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं.