जीव तर जाणार नाही ना..; सैफशी लग्न न करण्याचा सल्ला देणाऱ्यांना करीनाचं असं होतं उत्तर

| Updated on: Apr 21, 2024 | 5:27 PM

अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला अनेकांनी विरोध केला होता.

1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीत जेव्हा अभिनेत्री यशाच्या शिखरावर असतात, तेव्हा त्यांना लग्नापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर उद्ध्वस्त होतं, असं म्हटलं जातं. अभिनेत्री करीना कपूरने सैफ अली खानशी 2012 मध्ये लग्न केलं होतं. तेव्हा तिलासुद्धा सैफशी लग्न न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

2 / 5
करीनाने लग्नाच्या काही वर्षांनंतर याबद्दलचा खुलासा केला होता. 2020 मध्ये 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत करीना सैफसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. सैफसोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी तिने लिव्ह-इन रिलेशनशिपचा निर्णय घेतला होता. लिव्ह-इनमध्ये राहताना सैफने तिला लग्नासाठी विचारलं होतं.

3 / 5
त्यावेळी अनेकांनी सैफशी लग्न करू नकोस, तुझं करिअर उद्ध्वस्त होईल, असा सल्ला अनेकांनी दिल्याचं करीनाने सांगितलं. त्यांना करीना म्हणाली, "करिअरच संपेल ना? आयुष्य तर नाही संपणार. मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्याशी लग्न केल्याने जर निर्मात्यांना माझ्यासोबत काम करायचं नसेल तर ठीक आहे."

4 / 5
लग्नानंतरही करीना इंडस्ट्रीत सक्रिय असून तिने बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत. सैफ आणि करीनाच्या लग्नाला आता 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत.

5 / 5
करीना नुकतीच 'क्रू' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान हा ज्युनिअर एनटीआरसोबत 'देवारा पार्ट वन'मध्ये झळकणार आहे.