कपूर कुटुंब बॉलिवूडच्या प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. म्हणून कपूर कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. कुटुंबातील सदस्यांबद्दल अनेक चांगल्या - वाईट सवयी समोर येत असतात.
सध्या चर्चा अभिनेत्री करिश्मा कपूर हिची मुलगी समायरा कपूर हिच्याबद्दल रंगत आहे. समायरा हिची एक सवय अशी आहे, ज्यामुळे करीना कायम त्रस्त असते.
एका मुलाखाती करीना हिने मोठा खुलासा केला होता, 'समायरा माझ्या मुलीसारखी आहे. पण की कायम तिचा पूर्ण वेळ फोनमध्ये व्यतीत करत असते. समायराच्या या सवयीमुळे मी त्रस्त आहे' असं करीना म्हणाली होती.
सांगायचं झालं तर, कपूर कुटुंबात समायरा सर्वात जास्त लाडकी मुलगी आहे. करीना आणि करिश्मा यांच्यासोबत समायरा हिचं नातं घट्ट आहे. अनेक ठिकाणी तिघींना एकत्र स्पॉट केलं जातं.
करिश्मा करीना कायम सोशल मीडियावर समायरा हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. समायरा हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी, तिची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे.