Kargil Vijay Diwas: भारतीय सैनिकांच्या शौर्यासोबतच या शस्त्रास्त्रांद्वारे जिंकलं कारगिलचं युद्ध, वाचा सविस्तर
22 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यानं आपला पराक्रम दाखवतना पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवला होता. (Kargil Vijay Diwas: List of Weapons Used in Kargil war to defeat Pakistan Army, read more)
1 / 7
कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण झाल्यानं देशासाठी आपले प्राण देणाऱ्या सैनिकांना आज भारत आठवत आहे. 22 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यानं आपला पराक्रम दाखवतना पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवला होता. अशा परिस्थितीत आपण कोणत्या शस्त्रास्त्रांद्वारे हे युद्ध जिंकले त्याबद्दल जाणून घेऊ.
2 / 7
पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर: पाकिस्तानी सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरची प्रमुख भूमिका होती. डीआरडीओनं ट्रकवर बसवल्या जाणाऱ्या या यंत्रणेची रचना केली होती.
3 / 7
इंसास रायफल्स: कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय लष्कराच्या जवानांना इंसास रायफल्सनी सज्ज केलं होतं. या रायफलच्या माध्यमातून पाकिस्तानी सैनिकांना निद्रिस्त करण्याचं काम करण्यात आलं होतं. भारतात बनवलेली ही रायफल ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार केली गेली होती.
4 / 7
कॉर्ल गुस्ताव रॉकेट लाँचरः कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय लष्कराकडे कॉर्ल गुस्ताव रॉकेट लाँचर होता. या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याच्या बंकरांचा नाश झाला. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डानं हे रॉकेट लाँचर तयार केलं. हे स्वीडनमधून तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाद्वारे तयार केलं गेलं होतं.
5 / 7
बोफोर्स तोफ: कारगिल युद्धाच्या वेळी भारतानं पाकिस्तानला स्वीडनमध्ये बनवलेल्या बोफोर्स तोफातून गुडघे टेकण्यास भाग पाडलं. पाकिस्तानी सैनिक उंचीवर लपून बसले होते, मात्र या तोफातून हल्ला करून त्यांना ठार करण्यात आलं. याची श्रेणी 42 किमी पर्यंत आहे.
6 / 7
SAF कार्बाईन 2A1: भारतीय सैन्यानंही कारगिल युद्धाच्या वेळी SAF कार्बाईन 2A1 शस्त्र वापरलं. ही बंदूक सब-मशीन गन 1A1 ची सायलेंट व्हर्जन आहे, ज्यामध्ये बॅरेलमध्ये एक सायलेन्सर बसवण्यात येतो. त्याचं वजन कमी आहे, ज्यामुळे सैनिकांनी हे शस्त्र वापरणं फायद्याचं ठरलं.
7 / 7
AK-47 रायफल: कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय सैन्यानं शत्रूच्या सैनिकांशी लढण्यासाठी AK-रायफलचा वापर केला. या शस्त्राच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना उंच भागात देखील धार बनवण्यात खूप मदत मिळाली.