खतरो के खिलाडी 13 ची शूटिंग सध्या आफ्रिकेमध्ये सुरू आहे. नुकताच एका प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये अर्चना गाैतम ही दिसत आहे.
अर्चना गाैतम ही बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाली होती. अर्चना गाैतम ही बिग बाॅस 16 मधील वादग्रस्त स्पर्धेक ठरली. बिग बाॅस 16 मध्ये सर्वांसोबत भांडणे करताना अर्चना दिसली.
बिग बाॅस 16 नंतर अर्चना गाैतम ही खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाली. शिव ठाकरे हा देखील खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झालाय.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अर्चना गाैतम ही दिसत असून चांगलीच घाबरलेली अर्चना दिसत आहे. स्टंट करताना अर्चना गाैतम हिला भीती वाटत असल्याचे दिसत आहे.
इतकेच नाही तर स्टंट करताना भीती वाटत असल्याने अर्चना गाैतम थेट म्हणते की, हे देवा कुठे फसले मी. इतकेच नाही तर देवाकडे प्रार्थना करताना देखील अर्चना गाैतम दिसत आहे. ढसाढसा रडताना देखील दिसत आहे.