सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघं 6 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार नाहीत.
आतापर्यंत सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तारीख 6 फेब्रुवारी असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोडी 6 नव्हे तर 7 फेब्रुवारीला विवाहबद्ध होणार आहे आणि त्याच दिवशी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.
रविवारी कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लावली जाणार आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.
जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी 84 आलिशान रुम्स बुक करण्यात आले आहेत. तर लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी 80 गाड्यांचीही सुविधा करण्यात आली आहे.
कियारा आणि सिद्धार्थच्या संगीत आणि हळदीचा कार्यक्रम उद्या (6 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी लग्न आणि रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.