MI vs RR IPL 2022: कायरन पोलार्डचं Mumbai Indians साठी विलन ठरला? तो जुना पोलार्ड संपला?

| Updated on: Apr 03, 2022 | 4:18 PM

MI vs RR IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाला.

1 / 10
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाला. टीमचा सिनियर प्लेयर कायरन पोलार्ड या सामन्यात कमाल दाखवू शकला नाही. अखेरच्या हाणामारीच्या षटकात मुंबई इंडियन्सला विजयाची गरज होती, तेव्हा कायरन पोलार्ड खेळपट्टीवर होता.

2 / 10
कायरन पोलार्डसाठी राजस्थान रॉयल्स विरुद्धचा हा सामना फारसा चांगला ठरला नाही. गोलंदाजी करताना त्याने चार षटकात 46 धावा दिल्या. फक्त कॅप्टन संजू सॅमसनचा विकेट घेतला.

3 / 10
मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स

4 / 10
गोलंदाजी मध्ये पोलार्डकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यानंतर फलंदाजी करतानाही तो चमक दाखवू शकला नाही. पोलार्डकडून वेगवान धावांची अपेक्षा होती. पण तो फेल ठरला. पोलार्डने 24 चेंडूत 22 धावा केल्या. या दरम्यान त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

5 / 10
मुंबई इंडियन्सने पोलार्डला 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. पोलार्डचा जगातील सर्वोत्तम टी 20 क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो. मुंबई इंडियन्ससाठी तो अनेक मॅच विनिंग डावही खेळला आहे.

6 / 10
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने या सामन्यात शतकी खेळी साकारली.

7 / 10
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने फक्त 170 धावा केल्या. 23 धावांच्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला.

8 / 10
मुंबई इंडियन्सकडून इशान किशनने 54 धावांची खेळी केली. त्याशिवाय तिलक वर्माने 33 चेंडूत 61 धावा केल्या. 184 च्या स्ट्राइक रेटने धावा करताना तिलक वर्माने आपल्या डावात पाच षटकार लगावले.

9 / 10
आता ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स इशान किशन आला असून त्याने दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर असून त्याने देखील दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत.

10 / 10
जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने शनिवारी सामना जिंकला. जोस बटलरने (Jos buttler) या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. जोस बटलरने आपल्या फलंदाजीने अनेकांची मन जिंकून घेतली.