Marathi News Photo gallery Know About Income Tax slabs Rules in Pakistan And when Pakistani People give Tax on personal Income read here full rules
पाकिस्तानामध्ये कशा आहे इनकम टॅक्स स्लॅब? किती उत्पन्नावर वर्षाला टॅक्स भरावा लागतो, हे जाणून घ्या!
Income Tax in Pakistan : Income Tax Slabs In Pakistan: भारतातील इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल अनेकांना चांगली माहिती असेल परंतु आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये किती वार्षिक उत्पन्न इतके असेल तर सरकारला किती टॅक्स द्यावा लागतो?
1 / 6
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील अनेक गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत परंतु इनकम टॅक्स नियमांच्या बाबतीत भारतापेक्षा पाकिस्तान खूपच वेगळा आहे. पाकिस्तानमध्ये इनकम टॅक्स स्लॅब सुद्धा भारतदेशा पेक्षा वेगळे आहेत. पाकिस्तान मध्ये इनकम टॅक्स वसूल करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे तसेच येथील टॅक्स स्लॅब यांचे स्वरूप सुद्धा वेगळे आहे.आपल्यापैकी अनेकांना भारतातील टॅक्स याबद्दल माहिती असेल परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पाकिस्तान बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत तसेच या देशातील इनकम टॅक्स बद्दलचे नियम सुद्धा सांगणार आहोत.
2 / 6
इनकम टॅक्स बद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तानमध्ये सॅलरी प्राप्त करणारे लोक आणि स्वतःचे काम करणारे लोकांसाठी वेगवेगळे नियम तसेच नियम लावण्यात आलेले आहेत.यांची टॅक्स व्यवस्था सुद्धा आगळी वेगळी आहे याचा अर्थ सॅलरी पर्सन आणि नॉन सॅलरी पर्सन त्या दोघांना वेगवेगळ्या हिशेबानुसार टॅक्स भरावा लागतो.
3 / 6
जर वर्ष 2020- 21 च्या टॅक्स स्लॅब बद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान देशामध्ये एकंदरीत 11 स्लॅब आहेत तेथील जनतेला 5% पासून ते 35 टक्केपर्यंत टॅक्स द्यावा लागतो. त्याचबरोबर दोन्ही वर्गांना वेगवेगळ्या प्रकारची टॅक्स सवलत सुद्धा दिली गेलेली आहे. पाकिस्तानची वेबसाईट जिओटीव्ही यांच्या रिपोर्टनुसार वर्ष 2020 - 21 मध्ये 6 लाख रुपये सॅलरी प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला टॅक्स पासून वगळण्यात आलेले आहे म्हणजेच ज्या व्यक्तींची सॅलरी वर्षाला 6 लाख रूपये पेक्षा कमी आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही.
4 / 6
तसेच 6 लाख ते 11 लाख 20 हजार रुपये पर्यंत सॅलरी असणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त किमतीचे 5 टक्के टॅक्स भरावे लागतात याशिवाय 12 लाख लते 18 लाख सॅलरी असणाऱ्या लोकांना 10 टक्के तसेच 25 लाख रुपये असणाऱ्या लोकांना 15 ,35 लाख सॅलरी असणाऱ्या लोकांना 17.5, 50 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना 20% टॅक्स भरावा लागतो या शिवाय 22.5, 27.5, 30, 32.5 आणि 35 टक्के टॅक्स भरण्याचे स्लॅब देखील आहेत.
5 / 6
त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे सॅलरी शिवाय अन्य बिझनेस, फ्रीलान्स इत्यादी मार्गाद्वारे अनेक जण कमवत असतील तर त्यांच्या साठी सुद्धा वेगवेगळे नियम आहेत. येथे ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे अशा व्यक्तींना टॅक्समध्ये सवलत दिली जाते तसेच या कॅटेगरीमध्ये 4 लाखाची कमाई असणाऱ्या लोकांना सुद्धा सवलत दिली गेलेली आहे.
6 / 6
याचाच अर्थ जर तुम्हाला 4 लाख रुपये पर्यंतचे तुमचे उत्पन्न असेल तर अशा वेळी तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही आणि जास्त असेल तर अशा वेळी स्लॅब हिशेबानुसार तुम्हाला भरावा लागतो या कॅटेगरीमध्ये 15 ते 35 टक्के लावला जातो सोबतच यामध्ये 5, 10, 15, 20, 25, 30, 35 अशा प्रकारचे स्लॅब सुद्धा बनवले गेले आहेत.